रानभाजी प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन
वांझोळे (ता. संगमेश्वर):
शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून व शिवाजी माध्यमिक विद्यालय तर्फे वांझोळे येथे रानभाज्या प्रदर्शन व पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचा मूळ उदेश्य म्हणजे रानभाज्यांची ओळख , रानभाज्या का खाव्यात , त्यांचे औषधी गुणधर्म गावातील लोकांना पटवून देणे. या कार्यक्रमाला गावकरी आणि शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले. प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांनी बऱ्याच प्रकारच्या रानभाज्या व पाककलेतील पदार्थ प्रदर्शित केले.या स्पर्धेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.स्पर्धेत २० गट सामील झाले त्यामध्ये ४२ विद्यार्थांनी सहभाग घेतला. व त्यांनी रानभाजांचे ५५ पदार्थ बनवून आणले होते.
या कार्यक्रमामध्ये विशेष आकर्षण म्हणजे शाळेतील एका विद्यार्थिनींने पौष्टिक पिझ्याची संकल्पना मांडली होती. यामध्ये तिने टाकळा,कुरुडू, भारंगी, अळू या रानभाज्या समवेत आकर्षणासाठी तिने कांदा, टोमॅटो, काकडी यांचा वापर केला. या कार्यक्रमाची आम्ही व विद्यालयाच्या प्राचार्यांनी पाहणी केली व त्यामधून तीन क्रमांक काढण्यात आले.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे चेरमन मा. श्री अनिल पंदेरे, माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. लिंगायत सर व इतर सहशिक्षक व नारळ मित्र चेतन नाईक सर, तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. या सर्व कार्यक्रमास गावकऱ्यांनी व शाळेतील मुलांनी चांगला प्रतिसाद दिला.
कृषिदूत ऋषिकेश खाडे ,आकाश नांदुरकर, श्रीपाद मलकापुरकर, सोहम पांगारे, ओमकार पाटील, दयानंद साखरकर यांनी सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील , विभाग प्रमुख प्रा . एच.एस.भागडे , ग्रामीण कृषि कार्यानुभव अधिकारी प्रा. पी. बी. पाटील , प्रा. एन. सी. पाकळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
www.konkantoday.com