
मंत्री रवींद्र चव्हाण याच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल एका विरुद्ध तक्रार दाखल
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. राज्याचे रवींद्र चव्हाण यांच्या विरुद्ध सोशल मीडियावर मुंबई-गोवा महामार्गाबाबत आक्षेपार्ह पोस्ट करून द्वेष पसरविल्या प्रकरणी भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानुसार संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केलाआहे.
भाजप तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर यांनी तक्रार दिल्यानुसार मुंबई-गोवा महामार्गाबाबत ३० ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता कापसाळ येथील संशयित अरुण शांताराम नटे यांने त्याच्या फेसबुक या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन ना. रवींद्र चव्हाण
यांच्याबाबत गलिच्छ भाषेत शिविगाळ असलेली कमेंट व्हायरल केली आणि मंत्री महोदयांची, राज्य शासनाची व भाजप कार्यकर्त्यांमध्ये द्वेषाची भावना निर्माण केली आहे म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे करीत आहेत.
www.konkantoday.com