भारताची सूर्याकडे झेप! ‘आदित्य एल-1’चं यशस्वी प्रक्षेपण! इस्रोची आणखी एक मोठी कामगिरी


चांद्रयान-3 मोहिमेच्या यशानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच इस्रोने आणखी एक मोठी कामगिरी पार पाडली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
सकाळी 11:50 मिनिटांनी पीएसएलव्ही रॉकेटच्या मदतीने हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.

यानंतर काही दिवस आदित्य उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत राहणार आहे. त्यानंतर तो पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून, अंतराळात असणाऱ्या एल-1 पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू करेल. याठिकाणी पोहोचण्यासाठी सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर आदित्य उपग्रहाला एल-1 पॉइंटभोवती असणाऱ्या हेलो ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करण्यात येईल.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button