
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ ते एसटी स्टँड भागात मटका-जुगार चालवणार्या संशयितावर गुन्हा
रत्नागिरी शहरातील जयस्तंभ ते एसटी स्टँडमधील रस्त्याकडेला असलेल्या टपरीमध्ये मटका-जुगार चालवल्याप्रकरणी संशयितावर शहर पोलिसांनी गुन्हा दाख केला. गुरूवारी दुपारी १ च्या सुमारास कारवाई करण्यात आली. मोहसीन नुरमहंमद फणसोपकर (४०, रा. मुरूगवाडा, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील जयस्तंभ ते एसटी स्टँडमधील रस्त्यावर टपरीत मटका जुगार चालवला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १० जुलै २०२४ रोजी दुपारी १ च्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. यावेळी संशयित आरोपी हा लोकांकडून पैसे स्वीकारून मटका जुगार चालवत असल्याचे आढळले. त्यानुसार संशयिताविरूद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. www.konkantoday.com