शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रत्नागिरी , जिल्ह्याचे संपर्कप्रमुख व निष्ठावंत शिवसैनिक सुधीर भाऊ मोरे यांचे निधन


ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्थानकानजीक रुळांवर आढळून आला. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास सुधीर मोरे यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर मिळाला.
सुधीर मोरे गुरुवारी रात्री आपल्या खासगी अंगरक्षकांना बैठकीला जायचे आहे, असे सांगून बाहेर पडले. त्यांनी यावेळी आपल्यासोबत कोणालाही घेतले नव्हते. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास घाटकोपर रेल्वे स्थानकातील फास्ट ट्रॅकवर त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या मृत्यूविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दुपारी दोन वाजता सुधीर मोरे यांच्या निवासस्थानावरुन त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button