
१२ वी उत्तीर्ण, आता पुढे काय करायचं? वाचा, करिअरच्या ‘या’ नव्या चांगल्या संधी!
सध्या सगळ्यांनाच बारावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली आहे. कारण- राज्यातील १५ लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य या निकालावरून ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, आज सोमवारी (५ मे २०२५) दुपारी १ वाजता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम असतो की, आता पुढे काय करायचं? त्यांच्या स्ट्रीमनुसार कोणते कोर्सेस करता येऊ शकतात, ज्यातून त्यांना लाखो रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळू शकते.
या कोर्सेसबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू.*१२ वीनंतर करा हे कोर्सेस अन् महिन्याला कमवा चांगला पगार
*१) बिजनेस अँड मॅनेजमेंट*बारावीनंतर चांगला कोर्स करून मल्टिनॅशनल कंपनीत काम करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी बिजनेस अँड मॅनेजमेंट हे क्षेत्र उत्तम राहील.त्याशिवाय विद्यार्थी बीबीए, पीडीडीएम किंवा मार्केटिंग / फायनान्ससारखे कोर्स करून लाखो रुपयांच्या पॅकेजच्या नोकऱ्या मिळवू शकतात. पण, हे कोर्सेस विद्यार्थ्यांनी नामांकित विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थांमधून करणे गरजेचे आहे.
२) हार्डवेअर आणि नेटवर्किंग*ज्या विद्यार्थ्यांना आयटी कंपनीत काम करायची इ्च्छा आहे; पण इंजिनियरिंगला अॅडमिशन घेणं आर्थिकदृष्ट्या शक्य नाही, असं असेल, तसेच इंजिनियरिंगला पर्यायी कोर्स शोधत असाल, तर त्यांच्यासाठी हार्डवेअर आणि नेटवर्किंगमधील डिप्लोमा करणं उत्तम पर्याय ठरू शकतो.या डिप्लोमा कोर्सनंतर विद्यार्थ्यांना सहजपणे आयटी कंपनीत नोकरीची संधी मिळू शकते. कॉम्प्युटर, नेटवर्क सेटअप, रिपेअरिंग अशा स्किल्सच्या मदतीने विद्यार्थी आयटी कंपनीत नोकरी मिळवू शकतात. याच क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजची नोकरी मिळू शकते.
३) आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI)*सध्या अनेक क्षेत्रांमध्ये एआयची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. अनेक क्षेत्रांत याचा वापरही वाढतोय. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात असल्याचे बोलले जात आहे; पण एआयमुळे काही नोकऱ्या निर्माणदेखील होत आहेत. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून विद्यार्थी या क्षेत्रामध्येही चांगले करिअर करू शकतात. विद्यार्थी या क्षेत्रातील बीटेक एआय अँड डेटा सायन्समधील कोर्सेस करून चांगल्या पगारची नोकरी मिळवू शकता.
४) पॅरामेडिकल कोर्सेस
बारावीनंतर विद्यार्थ्यांसाठी काही पॅरामेडिकल कोर्सेसदेखील उपलब्ध आहेत. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विद्यार्थी या कोर्सेसविषयी माहिती घेऊ शकतात. उदा. सर्जरी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सोनोग्राफी मशीनशी निगडित, दंत सौंदर्यशास्त्राशी निगडित कोर्सेस आहेत. त्याशिवाय वैद्यकीय क्षेत्रातील उपकरणे आणि सहायक म्हणून अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत.
५) फार्मसीमध्ये करिअर
वैद्यकीय क्षेत्रात फार्मसी हे क्षेत्र खूपच महत्त्वपूर्ण मानले जाते. या क्षेत्रातही चांगले करिअर करता येऊ शकते. बारावीनंतर डी. फार्म आणि बी. फार्म हे कोर्सेस करून चांगल्या पगाराची नोकरी मिळवू शकता किंवा स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकता.
६) बीए फाईन आर्ट्स
*बारावीनंतर आर्ट डायरेक्टर, चित्रकला शिक्षक, कार्टुनिस्ट, ग्राफिक डिझायनर, सेट डिझायनर, इंटेरियर डिझायनर, अॅनिमेटर, फिल्म मेकिंगसारखे क्रिएटिव्ह कोर्सेसदेखील उपयुक्त ठरू शकतात. त्यातही तुम्हाला चांगल्या पॅकेजची नोकरी मिळू शकते.