मोकाट गुराना रिफ्लेक्टर व रेडियम लावण्यासाठी नियोजन मंडळातून तरतूद करावी- राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांची मागणी
रात्रीच्या वेळी रस्त्यावर बसणाऱ्या गुरांमुळे अपघात होत असून रस्त्यात मोकाट बसलेल्या गुराना रिफ्लेक्टर व रेडियम लावण्यासाठी नियोजन मंडळातून तरतूद करावी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे
रात्रीच्यावेळी रस्त्यांवरील मोकाट गुरे दिसण्यासाठी ठोस उपाययोजना म्हणुन त्यांच्या मानेला रिफ्लेक्टर पट्टा आणि शिंगावर रेडीयम लावणेसाठी जिल्हा नियोजनमधून निधीची तरतुद करून तात्काळ उपाययोजना राबविणेबाबत रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. सुदेशजी मयेकर यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले
जिल्ह्यातिल चार मुख्याधिकारी तसेच इतर संबंधीत अधिकारी यांना घेऊन लवकरच बैठक लावून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन मा. जिल्हाधीकारी यांनी रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष . सुदेशजी मयेकर यांना दिले
रत्नागिरी जिल्ह्यातील शहर आणि उपनगरातील मोकाट गुरे यांची संख्या वाढली असून मोठ्या प्रमाणात अपघात होत असून मोकाट जनावरांवर कारवाई करण्याबाबत संबंधीत प्रशासनाच्या संबंधित विभागाची बेपर्वाई, उदासीनता दिसून येते मोकाट जनावरे आज अक्षरश: नागरिकांच्या जिवावर उठली आहेत. मात्र या समस्येपासून नागरिकांची सुटका करण्यात संबंधित प्रशासनाकडुन कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे. मोकाट गुरे घोळक्याने फिरत असल्याने जिल्ह्यामध्ये रात्रीच्यावेळी मोठ्याप्रमाणत अपघात होत असून जखमी झालेल्यांचेही प्रमाण मोठे आहे याप्रश्नाकडे अद्याप कुणीही लक्ष दिलेले नाही जिल्हाधिकारी यांना निवेदन देतेवेळी त्यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री. राजन सुर्वे, ओबिसी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. सिध्देश शिवलकर, विद्यार्थी सेलचे जिल्हाध्यक्ष श्री. संकेत कदम, गोळप जिल्हापरीषद गट अध्यक्ष श्री. सुकेश शिवलकर आदी उपस्थीत होते.
माळ नाका येथे नगरपालिकेकडून वर्टीकल गार्डन करण्यात येणार होते त्यासाठ त्यासाठी २६ लाख रु. निधीची तरतुद करण्यात आली होती त्या वायफळ खर्चा विरोधात श्री. सुदेशजी मयेकर यांनी मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते ते वर्टीकल गार्डन रद्द झाल्यामूळे मा. जिल्हाधीकारी यांचे रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. सुदेशजी मयेकर यांनी आभार मानले.
www.konkantoday.com