प्रो गोविंदा चॅम्पियनशिप २०२३’च्या द्वारे महाराष्ट्राची संस्कृती आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन
महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे होणाऱ्या ‘प्रो गोविंदा २०२३ सीझन १’चे आयोजन एनएससीआय डोम, वरळी, मुंबई येथे करण्यात आले. महाराष्ट्राची ऐतिहासिक समृद्ध संस्कृती ही खेळाच्या माध्यमातून ‘प्रो गोविंदा चॅम्पियनशिप २०२३’द्वारे जपण्यात येत आहे. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या पाठिंब्याने आणि श्री. अजितदादा पवार यांच्या गतिमान नेतृत्वामुळे हा कार्यक्रम अनोखा झाला. ‘प्रो गोविंदा चॅम्पियनशिप २०२३’च्या द्वारे महाराष्ट्राची संस्कृती आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन होत आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उद्योगमंत्री मा. ना. उदयजी सामंत, श्री. दीपकजी केसरकर, श्री. मंगलप्रभातजी लोढा, श्री. संजयजी बनसोडे, श्री. श्रीकांतजी शिंदे, श्री. प्रतापजी सरनाईक, श्री. रवींद्रजी फाटक, मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे नेते नितीनजी सरदेसाई, हिंदी चित्रपटसृष्टी अभिनेते अभिषेक बच्चन आणि दहीहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com