देवरुख नगरपंचायतीमध्ये अग्निशमन वाहन दाखल
देवरुख :- देवरुखमध्ये आजवर झालेल्या आग नुकसानीच्या घटना पाहता त्यावर सुरक्षेचा उपाय म्हणून स्थानिक पातळीवर अग्निसुरक्षा वाहन आवश्यक होते. नगरपंचायत प्रशासनाने याबाबीचे गांर्भीय लक्षात घेवून अग्नीशमन वाहन मिळणेकरीता शासनाकडे सविस्तर प्रकल्प अहवाल सादर केला. महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानअंतर्गत नोव्हेंबर २०२२ मध्ये नगरपंचायतीला वाहन खरेदीकरीता रु. ५५ लक्ष मात्र निधी मंजूर झाला. या प्राप्त अनुदानातून ५ हजार लिटर क्षमतेचे वाहन घेणेत आले. दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी देवरुख नगरपंचायतमध्ये सदर वाहन दाखल झालेले आहे. ज्यामुळे स्थानिक आग नुकसानीच्या संकटावर मात करणे नगरपंचायत प्रशासनाला आता शक्य होणार आहे. त्यामुळे नागरीकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com