जालन्यातील मराठा आक्रोश आंदोलनामध्ये आंदोलकांवरील लाठीचार्जचा निषेध – राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुदेशजी मयेकर
जालन्यात अंतरवाली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आक्रोश आंदोलन शांततेने सुरु होते आज ४ था दिवस होता. मराठा आक्रोश आंदोलन शांततेने सुरु असलेले उपोषणावर लाठीचार्ज करणे हे अन्यायकारक असून रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आपण तीव्र निषेध व्यक्त करीत आहे असे जिल्हाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी सांगितले आहे. आंदोलकांवर अशाप्रकारे लाठीचार्ज करण्याची आवश्यकता होती का ह्याची चौकशी होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रामध्ये कुठलाही समाज असेल शेतकरी असतील महिला असतील त्यांना आंदोलन करण्याचा आपल्या संविधने ने अधिकार दिला आहे आहे आणि त्या अधिकाराने जालन्यामध्ये मराठा आक्रोश आंदोलन शांततेने सुरु होते असे असताना अशाप्रकारे पोलिस बळाचा वापर होणे योग्य नाही असे जिल्हाध्यक्ष सुदेशजी मयेकर यांनी सांगितले.
www.konkantoday.com