कोकण मार्गला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यावे – “अँड. ओवेस पेचकर”.

मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविषयी नुकताच कार्यक्रम घेण्यात आली. यावेळी अँड ओवेस पेचकर यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कोकण मार्गाला “छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी केली. मुंबई डोम्बिवली पूर्व येथील जिमखाना सभाग्रहत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर रवींद्र चव्हाण, कार्यक्रमाचे संयोजक काका कदम, माजी आमदार धैर्यशील पाटील, कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयंत दरेकर, दीपक चव्हाण, प्रभाकर सावंत, राजेश सावंत, केदार साठे, अविनाश मुलुख, भरत राजपूत, संजय बाबुराव मोरे विराजमान झाले होते अॅड. ओवेस पेचकर हे मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविषयी मुंबई उच्च न्यालयात जनहित याचीकl दाखल केले आहेत. ते २०१६ पासून महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी लढा देत आहेत. महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे याकरिता सामाजिक कार्यकर्ते श्रीधर उर्फ काका कदम सतत अग्रेसर राहिले आहेत. यावेळी बोलताना अँड. पेचकर म्हणाले महामार्गवर आतापर्यंत झालेल्या अपघातात अनेकांना प्राणास मुकावे लागले आहे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. मुंबई गोवा महामार्ग हे कोकणातील तीन जिल्ह्यातून जाते. रवींद्र चव्हाण हे आमचे कोकणकर असल्याने त्यांनी गेल्या दीड दशकांपासून रखडलेल्या महामार्गचे काम पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारायला हवी असल्याचे सांगितले. यावेळी पेचकर यांनी अपघातग्रस्तांसाठी ट्रॉमा सेंटर निर्माणचे काम करुन येथे तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करणेची आवश्यकता असल्याचे सांगून मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button