
आमदार अपात्रता प्रकरणी 14 सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार?
राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. आमदार अपात्रता प्रकरणी 14 सप्टेंबरपासून सुनावणी सुरू होणार आहे अशी माहिती विधीमंडळाच्या सूत्रांनी दिलीय.या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवण्यात सुरूवात झालीय. शिवसेना शिंदे गटाच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस बजावण्यात आलीय अशी सूत्रांची माहिती आहे. आमदारांना सुनावणीत सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. तसेच अपात्रतेच्या कारवाईपासून वाचण्यासाठी युक्तीवादही करावा लागेल. विधीमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात याप्रकरणाची सुनावणी होणार आहे.
www.konkantoday.com




