कोकण रेल्वे मार्गावरील कुमठा कुंदापुरा रेल्वेस्थानकादरम्यान १ सप्टेंबर रोजी ३ तासांचा मेगाब्लाक


कोकण रेल्वे मार्गावरील कुमठा कुंदापुरा रेल्वेस्थानकादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामासाठी १ सप्टेंबर रोजी ३ तासांचा मेगाब्लाक घेण्यात येणार आहे. दुपारी १ वाजून १० मिनिटांनी सुरू होणारा मेगाब्लॉक सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी संपेल. या मेगाब्लॉकमुळे
रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने बुधवारी सायंकाळी जाहीर केले.
मेगाब्लॉकमुळे कोकण मार्गावरून धावणाऱ्या १६३३३ क्रमांकाच्या वेरावल तिरुवअनंतपूरम एक्सप्रेसचा ३१ ऑगस्ट रोजी सुरू होणारा प्रवास रोहा कुमठा विभागादरम्यान तासांसाठी नियंत्रित केला जाणार आहे. १२६२० क्रमांकाची मंगळूरलोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस १ सप्टेंबर रोजी सुरतकलकुंदापुरा विभागादरम्यान १ तास ३०
मिनिटांसाठी थांबवण्यात येणार आहे. या बदलाची प्रवाशांनी याची नोंद घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
www.konkantoday.com
.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button