कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांच्या मदतीसाठी एसटी धावली
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांच्या मदतीसाठी म्हणजे त्यांना कोकणात जाण्यासाठी व आणण्यासाठी एसटी महामंडळाने पुढाकार घेतला आहे
कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भक्तांच्या गर्दीचा विचार करता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोकणासाठी अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. यंदा सुमारे ३५०० एसटी गाड्या सोडण्यात येणार आहेत.यातील सुमारे २३५० गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाले आहे. तसेच स्वारगेट बस स्थानकावरून सुमारे दीडशे बस सोडण्यात येणार आहेत. महिलांना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत असल्याने यंदाच्या वर्षी एसटीने प्रवास करणाऱ्या महिलांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.गणेशोत्सवासाठी मुंबईतून मोठ्या प्रमाणात भक्त कोकणातील आपल्या मूळ गावी जातात. ही संख्या मोठी असल्याने प्रवासी रेल्वे, एसटीसह खासगी गाड्यांचा आधार घेतात. एसटी प्रशासनाने देखील याचे नियोजन केले असून विविध आगारातून गाड्या मुंबईसाठी सोडल्या जाणार आहेत.
एसटी मुंबईत पोचल्यावर कोकणातील विविध गावांसाठी एसटी धावतील. गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी आधीपासूनच सीटचे आरक्षण केले आहे. यात ऑनलाइन आरक्षण ते समूह आरक्षणाचा समावेश आहे. त्यामुळे ऑगस्टमध्येच साडेतीन हजार पैकी २३५० बसचे आरक्षण झाले आहे. उर्वरित गाड्यांचे काही दिवसांत आरक्षण होण्याचा अंदाज आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी आहे.
www.konkantoday.com