ऑनलाइन फसवणुकीचा आणखी एक बळी,अभियंत्याला ऑनलाईन ५ लाखांचा गंडा
पोलिसांनी जागृती करूनही रत्नागिरी जिल्ह्यात ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार थांबत नसल्याची चिन्हे आहेत
चिपळूण शहरातील येथील खेर्डी एमआयडीसी मध्ये राहणाऱ्या अभियंत्याची सुमारे ५ लाखांची फसवणूक झाली आहे. रविकरण सीताराम पिंपळे (५० रा. एमआयडीसी कॉलनी खेर्डी, मुळ रा. दादर) असे झाल्याचे नाव आहे. पिंपळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांना एका अज्ञाताचा फोन आला. व त्याने फोनवरून तुमचे ॲक्सीस बँकेतील खाते बंद होण्याची शक्यता आहे, अशी भीती दाखवली. यानंतर व्हॉट्सअप मेसेज करून त्यांना एक ॲक्सीस बँक एपीके नावाची फाईल पाठविली. ही फाईल ओपन करून पॅनकार्ड अपडेट करा व एमपीन अपटेड करण्यास सांगितले. आपले बँकेतील खाते बंद होऊ नये, या भीतीने श्री. पिंपळे यांनी पॅन कार्ड व एमपीन अपडेट केले. त्यांच्या खात्यात असलेली १९ हजार ३८८ रूपये व मालवेअर अॅपमधन ४ लाख
९२ हजार ११५ रूपयांचे कर्ज घेऊन, या कर्जाची रक्कम पिंपळे यांच्या खात्यात आरोपीने जमा केली. त्यानंतर त्याने ४ लाख ८६ हजार ४९८ रूपये परस्पर दुसऱ्याला वळवली. २५ हजार रूपये पिंपळे यांच्या खात्यात सिंग नामक या व्यक्तीने जमा केल्याचे दिसून आले. यामध्ये पिंपळेची ४ लाख ८६ हजार ४९८ रूपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे
www.konkantoday.com