इंडिया आघाडीची ताकद पाहून चीनही मागे हटेल – संजय राऊत
इंडिया आघाडीची ताकद पाहून चीनही मागे हटेल असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे
विरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईत बैठक आहे.मुंबईत ग्रँड हयातमध्ये आज आणि उद्या देशभरातले विरोधक एकत्र येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला खुले आव्हान दिले आहे.इंडिया आघाडीला हरवणं कुणाच्या बापाला शक्य नाही असे संजय राऊत म्हणाले. इंडिया आघाडीला भाजप घाबरलंय तसेच इंडिया आघाडीची ताकद पाहून चीनही मागे हटेल असेही ते यावेळी म्हणाले.
इंडिया आघाडीच्या मुंबईतील बैठकीआधीच खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. त्यांनी वर्षावर बैठक घेऊद्या किंवा चांद्रयान 3 खाली बोलवून पुन्हा चंद्रावर जाऊन बैठक घेऊ द्या. आम्ही एक आहोत आणि एक राहणार असे राऊत म्हणाले. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राहुल गांधी हे देशाचे निर्विवाद नेता आहेत. ते देशात वातावरणनिर्मिती करत आहेत. त्यांच्यावर लोक प्रेम करतात. त्यांच्या नेतृत्वात काम करायचे आहे, असेही यावेळी राऊतांनी सांगितले.
www.konkantoday.com