
अश्लिल व्हिडिओ द्वारे ब्लॅकमेल करून तरुणाला आत्महत्येसप्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल
अश्लिल व्हिडिओ द्वारे ब्लॅकमेल करून तरुणाला आत्महत्येस
प्रवृत्त करणाऱ्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळीने माध्यमांतून झालेल्या अश्लिल व्हिडीओ ब्लॅकमेल ब्लॅकमेल करून करून धमकी देत पैशाची मागणी केल्याने चिपळुणातील १९ वर्षीय तरुणाने ९ रोजी आत्महत्या केली होती
याप्रकरणी पोलिसांनी राजस्थान येथील 18 वर्षीय तरुणासह अन्य तीन अनोळखी मोबाईल क्रमांक जणावर आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी व खंडणीप्रकरणी अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या प्रकरणी किशनराम भन्वरलाल पातीर( राहणार बिकानेर राजस्थान) याचे सहराजस्थानमधील अन्य तिघांचा समावेश आहे
सेक्सटॉर्शन करणाऱ्या टोळीने आपापसात संगनमत करून चिपळुणातील १९ वर्षीय तरुणाशी समाज माध्यमांद्वारे ओळख केली. तसेच त्याच्यासोबत अश्लिल व्हिडोओ कॉल केला. त्यानंतर व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून त्याद्वारे ब्लॅकमेल करत हे फोटो व व्हिडिओ युट्युब वर अपलोड करण्याची तसेच समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी दिली तसेच गुगल कंपनीकडून बोलत असल्याचे भासवून पोलीस विभागाकडे तक्रार केल्याची भीती दाखवून चिपळूणातील या तरुणा कडून 11,500 च्या खंडणीची मागणी केली ही रक्कम त्या तरुणाने ऑनलाइन पाठवली तरी देखील त्याला वारंवार धमक्या दिल्या जात होत्या या त्रासाला कंटाळून या तरुणांने आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली होती
Wwww.konkantoday.com




