
रत्नागिरीचे जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीच्या बनावट जीआर प्रकरणी आणखी एका आरोपीला अटक
रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या बदलीचा बनावट जीआर काढल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी अर्जुन सकपाळ याला मदत करणाऱ्या अक्षय आनंदा बुडके (२८, रा. कोथळी, करवीर, कोल्हापूर) या दुसऱ्या आरोपीला अटक केली आहे अक्षयला रत्नागिरी शहर पोलिसांनी बुधवारी पहाटे रत्नागिरीतच अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असते त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
www.konkantoday.com