
नरेंद्र मोदीच देशाचे पंतप्रधान होणार ही काळ्या दगडावरची रेेघ-उद्योग मंत्री उदय सामंत
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तीन मित्र पक्षांची ३१ आणि १ तारखेला संयुक्त बैठका आणि आढावा घेण्याचे निश्चित झाले आहे. या संपूर्ण कार्यक्रमाला भाजप, शिवसेना राष्ट्रवादीसह आरपीआय रामदास आठवले गट, आरपीआय जोगेंद्र कवाडे गट, हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, जनस्वराज शक्ती, महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष, बच्चू कडूचा प्रहार जनशक्ती पक्ष, सदाभाऊ खोत यांची रयत क्रांती पक्ष हे सर्वच घटक पक्ष एकत्र मिळून ३१ ऑगस्टला सायंकाळी ८ वाजता वर्षा निवासस्थानी सर्व प्रमुख नेत्यांचा आणि मंत्र्यांचा भोजन कार्यक्रम आणि चर्चा असा पहिला कार्यक्रम असेल असे प्रसाद लाड यांनी सांगितले.आमदार प्रसाद लाड आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
१ तारखेला सकाळी ९वाजल्यापासून तिन्ही पक्षांचे सर्व आमदार, मंत्री आणि सर्व पक्षप्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक लोकसभेच्या माध्यमातून घेतील जाणार आहे. हा कार्यक्रम सकाळी ९ वाजता सुरु होणार आहे. प्रथम मुंबई शहर आणि कोकण हा सकाळी १० ते १२ या वेळेमध्ये असणार आहे. १२ ते १.३० यावेळेत विदर्भ असेल, १.३० ते २.३० मराठवाडा, ३ ते ४.३० पश्चिम महाराष्ट्र, ४.३० ते ५.३० उत्तर महाराष्ट्र असणार आहे. अशाप्रकारे हा कार्यक्रम २ दिवस असणार आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, बैठक २ दिवस पार पडणार आहे. कदाचित आमची बैठक होती म्हणून त्यांनी त्यांची बैठक लावली. त्यांची जी बैठक आहे त्यामध्ये आउटपुट शून्य आहे, त्यातून काही फार मोठं होईल फार मोठं देशाला मिळेल असं मला वाटत नाही. खासदारकीच्या निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबच देशाचे पंतप्रधान होणार आहेत ही काळ्या दगडावरची रेेघ आहे. मागच्या वेळी सुद्धा लोक एकत्र आली होती, लोक एकत्र येऊन सुद्धा पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना कौल देण्यात आला होता. मला वाटत मागच्या पेक्षा जास्त फरकाने नरेंद्र मोदी जिंकतील आणि त्यांच्या मनामधील संभ्रम दूर होईल असे उदय सामंत म्हणाले.
www.konkantoday.com