आदर्श शिक्षक पुरस्कारासाठीं जिल्हाभरातील ३० शिक्षकांच्या मुलाखती व परीक्षा पार पडली
शिक्षकदिनी ५ सप्टेंबरला दिल्या जाणार्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठींची यावर्षीची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे.यासाठी जिल्हाभरातील ३० शिक्षकांच्या मुलाखती व परीक्षा पार पडली. यंदा प्रत्येक तालुक्यामधून दोनपेक्षा जास्त प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यामुळे चूरस वाढली आहे. अंतिम मंजुरीसाठीचा अहवाल कोकण आयुक्त कार्यालयात गेला असून, लवकरच पुरस्कारांची घोषणा होईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील ९ तालुक्यातून प्रत्येकी एका शिक्षकाला पुरस्कार देण्यात येतो तसेच एका शिक्षकाला विशेष पुरस्कार दिला जातो. असे एकूण १० जणांना पुरस्काराचे वितरण केले जाते. दरवर्षी शिक्षकदिनी ५ सप्टेंबरला हा कार्यक्रम घेतला जातो. यावर्षीही शिक्षण विभागाकडून कार्यक्रमाची तयारी सुरू केली आहे. गतवर्षी मात्र पुरस्कार जाहीर झाले होते; मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ५ सप्टेंबरचा मुहूर्त टळला होता. दिवाळीनंतर या पुरस्कारांचे वितरण झाले होते.यावर्षी जिल्हाभरातून छाननी करून ३० अर्ज अंतिम करण्यात आले होते. या ३० जणांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या आहेत.
www.konkantoday.com