
सांडपाणी गटारा ऐवजी रस्त्यावरून वाहू लागले, रत्नागिरी नगर परिषदेची किमया
रत्नागिरी नगर परिषदेच्या नवीन बांधण्यात आलेल्या गटारामुळे पाणी गटारातून वाहून जाण्याऐवजी रस्त्यावरून वाहत असल्याचे दृश्य रत्नागिरी कराना पहावयाला मिळत आहे ही किमया घडवली आहे जेल नाक्यावर बांधण्यात आलेल्या नगर परिषदेच्या नव्या गटारामुळे काल रत्नागिरी शहरात पडलेल्या मुसळधार पावसाच्या सरीमुळे जयस्तंभ परिसरात मध्यवर्ती बँक ते जयस्तंभ सर्कल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी साचून राहिले होते त्यातच वाहनांच्या वाहतुकीमुळे हे पाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत होते
विकासाची कामे थांबवायची नाहीत हे ध्येय घेतलेल्या रत्नागिरी नगर परिषदेने पावसात नव्याने बांधकामे करू नये असे नियम असतानाही भर पावसात रत्नागिरी शहरातील अनेक गटारांची कामे सुरू केली त्यापैकी जेल नाका ते मध्यवर्ती बँकेपर्यंतच्या गटाराचे काम सुरू करण्यात आले काम सुरू केल्यानंतर पावसाळा सुरू झाल्यामुळे हे काम अनेक वेळेला रेंगाळत ठेवावे लागले काही वेळेला भर पावसातही काम चालू ठेवण्यात आले होते त्यामुळे हे काम किती दर्जेदार झाले असावे हा प्रश्नच आहे या ठिकाणी पूर्वीचे गटार होते त्यातील काही भागातून पाणी आंबेडकर सर्कल समोरील पर्या
मधून वाहून जात होते या गटारात अनेक भागातील पाणी एकत्र येत असल्याने पाण्याचा जोर जास्त असतो परंतु नव्याने बांधण्यात आलेल्या गटारात पर्यामध्ये पाणी सोडण्याचा पर्याय बंद करून त्या ठिकाणी बंदिस्त गटार बांधण्यात आले त्यामुळे काल मुसळधार पावसाची सर येताच गटारातील पाणी बी अँड सी कार्यालयाच्या बाहेर असलेल्या गटारा मधून बाहेर येऊन रस्त्यावर वाहू लागले त्यामुळे गटारातील दुर्गंधीयुक्त पाणी बी अँड सी कंपाउंड ते जयस्तंभ परिसरात मोठ्या प्रमाणावर येऊन साचले पूर्वी या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर पाण्याचा लगेच निचरा होत होता परंतु आता गटाराचे पाणी मोठ्या वेगाने या ठिकाणी येत असल्यामुळे पाऊस गेल्यानंतरही या ठिकाणी बराच काळ पाणी साठवून राहत आहे मार्ग रहदारीचा असल्यामुळे नागरिकांना त्रास सोसावा लागत आहे मुळात या गटाराचे नियोजन करताना गटाराचे पाणी कुठे सोडायचे याचा विचार करणे आवश्यक होते कारण बी अँड सी कार्यालया पासून पुढे असलेली जुनी गटारे मातीने पूर्णपणे बुजली आहेत त्यामुळे हे पाणी गटारात न जाता रस्त्यावर येत आहे या गटाराचे कंत्राट दिल्यानंतर त्यावर नगर परिषदेची देखरेख आहे की नाही हेही कळू शकत नाही कारण अनेक महिने चाललेल्या या गटाराचा दर्जा सामान्य लोकांच्या नजरेसही पडत होता टेंडर करताना ज्या कंत्राटदाराने अटी पूर्ण केल्या आहेत की नाही हेही पाहिले गेले की नाही हे स्पष्ट झाले नाही कारण या ठिकाणी कलर पेवर ब्लॉक वापरण्याची अट पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराने चक्क साध्या पेवर ब्लॉक ला पिवळा वर लाल रंग फसला आहे शेवटी विकासाची कामे जनतेच्या पैशातून केली जातात आणि त्याच्या अनेक वर्षे जनतेला उपभोग घेता यावा हा उद्देश असतो परंतु सध्या ठिकठिकाणी या उद्देशाला हरताळ असल्याचे दिसत आहे आता याबाबत नगर परिषदेचे प्रशासन कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे
www.konkantoday.com
