बोरसुत येथे बसचे स्टिअरिंग जाम झाल्याने गाडी गटारात, सुदैवाने कोणी जखमी नाही
देवरुख बोरसुत येथे बसचे स्टिअरिंग जाम झाल्याने गाडी गटारात जाण्याचा प्रकार घडला आहे देवरुख आगाराच्या नादुरुस्त गाड्यांबाबत या आधी सर्व लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला होता
काही दिवसापुर्वी देवरुख आगारातील एका चालकाने स्वत:ची एक ध्वनीचित्रफित तयार करुन राज्य परिवहन महामंडळाच्या देवरुख आगारातील अनागोंदी कारभार जनतेसमोर आणला होता. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती व अधिकाऱ्यांनी सर्व गाड्या सुरक्षित असल्याचे जाहीर केले होते व्हिडिओ बनवल्याबद्दल वाहकावर कारवाई केली परंतु आपल्या गाड्या सुरक्षित आहे की नाही याचीही पाहणी अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे होते
गाड्यांची देखभाल न झाल्याने अनेक ठिकाणी गाड्या बंद पडत आहेत.
आज सकाळी बोरसुत येथे बसचे स्टिअरिंग जाम झाल्याने गाडी गटारात गेली. सुदैवाने गाडी गटारात जाण्यावरच निभावले सुदैवाने मोठा अपघात टळला
प्रवाशांच्या जीवाशी खेळणा-या एस टी प्रशासनाला एखादा मोठा अपघात झाल्याशिवाय जाग येणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे
www.konkantoday.com