डंपरच्या काचा फोडलेल्या मनसे सैनिकांची जामीनावर सुटका


मनसेच्या कोकण जागर यात्रेची सांगता कोलाड येथे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या सभेने झाली. यावेळी राज ठाकरे यांच्या सभेनंतर खेड तालुक्यातील बोरज येथील महामार्ग कार्यालया शेजारी तसेच टोल नाक्या शेजारी ठेकेदाराच्या उभ्या करून ठेवलेल्या डंपरच्या काचा मनसे कार्यकर्त्यांनी फोडल्या होत्या याप्रकरणी सोमवारी पोलिसांनी मनसे कामगार सेनेचे राज्य सरचिटणीस संजय आखाडे आणि मनसैनिक गणेश सुर्वे या दोन कार्यकर्त्यांना अटक केली असून न्यायालयाने जामीनावर त्यांची सुटका केली दरम्याने तोडफोड प्रकरणी जामीनावर सुटलेल्या मनसेच्या कट्टर सैनिकांचे मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी कौतुक केले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button