जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा राधाकृष्ण श्री २०२३ चा मानकरी ठरला सुरेश सत्यवान भाताडे


रत्नागिरी शहरातील श्री राधाकृष्ण मंदिरात झालेल्या जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचा राधाकृष्ण श्री २०२३ चा मानकरी सुरेश सत्यवान भाताडे (फिनिक्स फिटनेस जीम) झाला.तर बेस्ट पोझरचा मान मोहित सुभाष गुजर (फिटनेस जीम, देवरुख) आणि उगवता तारा स्वप्नील संतोष घाटकर (पाटील जिम, पावस) ठरला.
हीस्पर्धा उंचीच्या चार गटात होऊन त्यातून राधाकृष्ण श्री, उगवता तारा, बेस्ट पोझर अशी बक्षीसे काढण्यात आली. जिल्ह्यातून ६० स्पर्धक सहभागी झाले. स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार, रत्नसिंधू योजनेचे सदस्य प्रमोद जठार यांनी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर, राधाकृष्ण वैश्य मंदिर संस्थेचे अध्यक्ष राजन मलुष्टे, रत्नागिरी जिल्हा शरीरसौष्ठव असोसिएशनचे अध्यक्ष सदानंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी उद्योजक दादा वणजू, प्रवीण मलुष्टे, सतीश दळी, वसंत भिंगार्डे, मकरंद खातू आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धा चालू असताना राज्याचे उद्योगमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. त्यांचा सत्कार वैश्य युवातर्फे वीरेंद्र वणजु, सौरभ मलुष्टे, सचिन केसरकर, मनोर दळी, अभिज्ञ वणजु, मुकुल मलुष्टे, कुंतल खातू, युवराज शेट्ये यांनी केला. वैश्य युवाच्या सामाजिक व क्रीडाविषयक कामाचे मंत्री उदय सामंत यांनी कौतुक केले. राधाकृष्ण मंदिरात होणाऱ्या कबड्डी स्पर्धांची आठवण काढली व सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी किताब विजेता सुरेश सत्यवान भाताडे याला मानाचा पट्टा उद्योजक विरेंद्र वणजु यांनी घातला. आकर्षक चषक, पारितोषिक अभिज्ञ वणजु व सचिन केसरकर, सौरभ मलुष्टे यांनी दिले. बेस्ट पोझर मोहित सुभाष गुजर याला मिलिंद दळी यांच्या हस्त गौरवण्यात आले. उगवता तारा स्वप्नील घाटकर याला अभिज्ञ वणजु यांनी आकर्षक चषक, रोख बक्षीस दिले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी वैश्य युवा संघटनेचे सर्व सहकारी, रत्नागिरी जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटना, पदाधिकारी सदानंद जोशी, शैलेश जाधव, जितेंद्र नाचणकर, दीनानाथ कोळवणकर, संदेश चव्हाण, फैय्याज खतीब, नरेंद्र वणजु, श्री. पाटील, अंकुश कांबळे, संजय रावणांक, राज नेवरेकर, कामेरकर, हेमंत जाधव यांनी सहकार्य केले. शाश्वत मानकर, दीनानाथ कोळवणकर, संजय डेरवणकर, अजिंक्य धुंदूर यांचा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
स्पर्धेचा निकाल असा
गट पहिला- प्रथम- सुरेश सत्यवान भाताडे (फिनिक्स जीम, रत्नागिरी), द्वितीय- सुरज किशोर शिंदे (इक्वीनॉक्स जीम, रत्नागिरी), तृतीय- आकाश सुरेश जाधव (व्हिजन जिम, खेड), चौथा- प्रणय प्रदीप चोरगे (आरएसपीएम, राजापूर), पाचवा- निहित सुभाष गुजर (फिनिक्स जीम देवरुख)
गट दुसरा- प्रथम- अतिष महेंद्र विचारे (फ्लेक्स हार्डकोअर जीम, रत्नागिरी), द्वितीय हर्षद दत्तात्रय मांडवकर (आरएसपीएम, राजापूर), तृतीय वैभव विजय मेस्त्री (फिनिक्स जीम, रत्नागिरी), चौथा- संकेत सुधाकर साळवी (सीडब्ल्यूजे, चिपळूण), पाचवा- दिपक दत्ताराम बिजीतकर (पवार फिटनेस, सावर्डे)
गट तिसरा- प्रथम- स्वप्नील संतोष घाटकर (पाटील जीम, पावस), दुष्यंत संदेश पाथरे (सी लायन, नाटे), तृतीय- संजय शिवाजी डेरवणकर (पवार जिम, सावर्डे), चौथा- गणेश संजय गोसावी (पवार फिटनेस, सावर्डे), पाचवा- महेश मधुकर चाळके (फोर्स फिटनेस, खेर्डी).
गट चौथा- प्रथम- दीपक श्रीधर देसाई (सी लायन, नाटे), द्वितीय- निनाद विदुल करंजवकर (वेलनेस, चिपळूण), तृतीय- अब्दुल समद सोलकर (इक्वीनॉक्स, रत्नागिरी), चौथा- सागर शरद साप्ते (न्यू गोल्ड जीम, मंडणगड), पाचवा- नागेश गजानन राऊत (फ्लेक्स हार्डकोअर जीम)
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button