डॉ. श्रीधर ठाकूर यांना कोकणभूषण, प्रमोद कोनकर यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान


डोंबिवलीतील कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांना कोकणभूषण, तर ज्येष्ठ पत्रकार आणि कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर यांना कोकणरत्न पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रतिष्ठानतर्फे आयोजित भजनोत्सव स्पर्धेचे बक्षीस वितरण, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्यांना कोकणरत्न पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा रविवारी (२७ ऑगस्ट २०२३) सायंकाळी डोंबिवली (पश्चिम) येथील महात्मा फुले रस्त्यावरील मराठा हितवर्धक मंडळ हॉलमध्ये पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राजापूरचे आमदार राजन साळवी उपस्थित होते. पद्मश्री गजानन माने, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे निवृत्त सचिव चंद्रकांत माने, राजापूर लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, माजी परिवहन सभापती राजेश कदम, माजी नगरसेवक नंदू धुळे मालवणकर, प्रा. डॉ. विनय भोळे, उद्योजक विश्वास चव्हाण आदी मान्यवरही या वेळी उपस्थित होते.

कोकणरत्न पुरस्कार मिळालेले मान्यवर पुढीलप्रमाणे
कोकणभूषण – डॉ. श्रीधर ठाकूरदेसाई
कोकण समाजभूषण – कै. गोपाळराव नारायण राणे (मरणोत्तर)
कोकण कलायोगी – कै. नितीन चंद्रकांत देसाई (मरणोत्तर)
कोकण कलारत्न – प्रभाकर मोरे
कोकण साहित्यरत्न – अशोक लोटणकर
कोकणरत्न पत्रकारिता – प्रमोद कोनकर
कोकण समाजरत्न – सुनील कदम/गौरी सुरेश सावंत
कोकण शिक्षणरत्न – महेंद्र साळवी/सुप्रिया सावंत
कोकण कृषिरत्न – सचिन आणि समीर अधिकारी
कोकण क्रीडारत्न – राहुल जाधव
कोकण शौर्यरत्न – शिवाजी बने
कोकण उद्योगरत्न – विशाल जाधव

भजनोत्सव स्पर्धेचा निकाल
पुरुष
प्रथम क्रमांक :
विष्णू स्मृती संगीत प्रसारक भजन मंडळ (डोंबिवली)
द्वितीय क्रमांक :
लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ (विरार)
तृतीय क्रमांक :
श्री सोमजाई देवी प्रासादिक भजन मंडळ (दिवा)
सर्वोत्कृष्ट गायक :
तेजस तुकाराम करगुटकर, श्री देव ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ (डोंबिवली)
सर्वोत्कृष्ट पखवाजवादक :
गजानन दळवी – श्री देव वेताळ रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ (डोंबिवली)
सर्वोत्कृष्ट चकवावादक :
प्रसाद मडव – श्री स्वामी समर्थ कृपा प्रासादिक भजन मंडळ (डोंबिवली)

महिला
प्रथम क्रमांक :
आई भवानी प्रासादिक भजन मंडळ (सांताक्रूझ)
द्वितीय क्रमांक :
विठाई भजन मंडळ (डोंबिवली)
तृतीय क्रमांक :
तृतीया भजन मंडळ (हेदुटणे)
सर्वोत्कृष्ट गायिका :
ऋतिका मुरुडकर – आई भवानी प्रासादिक भजन मंडळ (सांताक्रूझ)
सर्वोत्कृष्ट चकवावादक :
वरद सिद्धिविनायक भजन मंडळ (डोंबिवली)

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोकण युवा प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली. भजन स्पर्धेचे सूत्रसंचालन कुणाल मोरे व विराज चव्हाण यांनी केले. भजन स्पर्धेचे नियोजन भजन स्पर्धा प्रमुख सच्चिदानंद हांदे व रोशन मोरे यांनी केले. बक्षीस वितरण व पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन दिनेश मोरे यांनी केले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चाळके यांनी उपस्थितांचे आभार मानले.

डोंबिवलीत कोकण युवा प्रतिष्ठानची स्थापना २०१२ मध्ये झाली. प्रतिष्ठानतर्फे दर वर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार प्रदान केले जातात. तसेच वृक्षारोपण, भजनोत्सव अशा विविध उपक्रमांचेही दर वर्षी आयोजन केले जाते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button