
राजापूर येथील पासपोर्ट कार्यालय रत्नागिरी येथे स्थलांतरित करा
राजापूर येथे असलेले पासपोर्ट कार्यालय रत्नागिरी येथे स्थलांतरित करण्यात यावे अशी मांगणी आज शिवसेना अल्पसंख्यांक सेनेने राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना.उदय सामंत यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.
रत्नागिरीचे पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना रत्नागिरी शिवसेना अल्पसंख्यांक समाजाने शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे भेट घेवून सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्हयासाठी राजापूर येथे पासपोर्ट ऑफिस सुरु करण्यात आले त्या ठिकाणी राजापूर येते मोक्याच्या ठिकाणी रेल्वे स्टेशन नाही. तसेच सर्वच रेल्वे गाड्या या ठिकाणी थांबत नाही. तसेच नेटवर्क, लाईट, अशा अनेक समस्या या ठिकाणी आहेत. तसेच मंडणगड, खेड, चिपळूण, दापोली तालुक्या साठी हा पल्ला लांब पडत असल्याने अनेकजण मुंबई पासपोर्ट काडण्यासाठी जात असतात. रत्नागिरी मध्ये सर्व रेल्वे थांबत असल्याने रत्नागिरी सर्वांच्या सोयीचे ठिकाण आहे. रत्नागिरीत असलेल्या अशा विविध सोयीमुळे राजापूरला जाणे खर्चिक आणि त्रासदायक असल्याने ते कार्यालय रत्नागिरी सारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी करावे, अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली.
या निवेदनावर शेकडो हिंदू मुस्लिम बांधवानी सह्या करून पासपोर्ट कार्यालय लवकरच रत्नागिरी येथे स्थलांतरित करावे अशी मांगणी केली. लवकरच हे कार्यालय रत्नागिरी येथे सुरु होण्यासाठी कार्यवाही करू अशी हमी ना. उदयजी सामंत यांनी दिली आहे. सदर निवेदन देण्यासाठी अल्पसंख्यांक सेना तालुका प्रमुख अल्ताफ संगमेश्वरी, फैयाज मुकादम, सुहॆल मुकादम, मूसा काझी, अझीम चिकटे, मुज्जू मुकादम, आदिल फणसोपकर, अति्क गडकरी, नाझिया मुकादम, शकील मोडक. समीर झारी, साहिल पठाण,नौमान मुकादम, इल्लू खोपेकर, सचिन शिंदे, दीपक पवार, उबेद होडेकर, रमजान गोलंदाज, जमूरत अलजी सुहॆल साखरकर, नासीर काझी, तुफील पटेल, रिझवान मुजावर, फैसल मुल्ला,अख्तर शिरगांवकर,राजेश तिवारी, इस्तियाख खान,उपस्थित होते.
www.konkantoday.com