![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2023/04/WhatsApp-Image-2023-04-25-at-10.47.44-AM.jpeg)
भाजपने जाणीवपूर्वक महामार्ग रखडविला : आ. भास्कर जाधव यांचा आरोप
कोकणातील खासदार, आमदारांमुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम
रखडले, असे सांगणाऱ्या मनसेने हा प्रकल्प नॅशनल हायवेचा आहे, केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे, त्यांची ही जबाबदारी नाही का, याचा विचार करावा, असे सांगत मनसेसारख्या एका जबाबदार पक्षाने असा आरोप करणे हास्यास्पद आहे, असे उबाठा शिवसेना नेते आमदार भास्करशेठ जाधव यांनी सांगितले.
महामार्गाच्या कामाबाबत मी अनेकदा ना. गडकरी यांना भेटलो आहे. मराठवाड्यात शिवसैनिकांनी महामार्गाचे का रोखले, कोकणात कुणाचा विरोध आहे, कुणामुळे हा प्रकल्प रखडला, असे मी त्यांना विचारले, त्यावर कसलेली उत्तर नाही. एकदा व्हॅनिटी व्हॅन आणा आणि पनवेल ते चिपळूण, अशी आपण पाहाणी करु, वस्तुस्थिती समजून घेऊ, असेही सांगितले परंतु त्यानंतर काहीच घडले नाही कोकणात भाजप वाढत नाही म्हणून जाणीवपूर्वक हे काम रखडवले गेले आहे साई आरोप जाधव यांनी केला
www.konkantoday.com