पोषण ट्रॅकर प्रणालीत रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम
महिला व बालकास विभाग व महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सावर्डे येथे आयोजित केलेल्या अंगणवाडी कर्मचारी व महिला बचत गट मेळाव्यात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या कामकाजाचे कौतुक केले. पोषण अभियांतर्गत सुरू असलेल्या पोषण ट्रॅकर या कार्यप्रणालीत आधार व्हेरिफिकेशनच्या बाबतीत रत्नागिरी जिल्हा राज्यात प्रथम आल्याबद्दल जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्पाधिकारी यांचा सन्मान करण्यात आला.
मेळाव्यात महिला बालविकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या माझी कन्या भाग्यश्री लाभार्थ्यांना मुदत ठेव प्रमाणपत्र देण्यात आली. त्याचबरोबर विभागांतर्गत सुरू असलेल्या अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका पदभरती प्रक्रिया अंतर्गत प्राथमिक स्वरूपामध्ये अंगणवाडी मदतनीस यांना नियुक्ती आदेश देण्यात आले. त्याचबरोबर बालसंगोपन योजनेच्या लाभार्थ्यांनाही बालसंगोपन मंजुरी आदेशाचे वाटप करण्यात आले.
महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत कडवईतील विश्वकर्मा महिला बचत गटाला १४ लाख, जय हनुमान महिला बचत गटाला १० लाख व सोनवडेतील लक्ष्मी स्वयंसहायता बचत गटाला १० लाख रुपये कर्ज मंजुरीच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. यनिमित्ताने पुरुष सुधारक सन्मान पुरस्कार देऊन पाच जणांचा सन्मान करण्यात आला. या वेळी आमदार शेखर निकम, महिला बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत हावळे, महिला आर्थिक महामंडळचे अमरीश मिस्त्री, प्रांताधिकारी आकाश लिगाडे, महिला बालकल्याणचे अधिकारी, कर्मचारी व बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या.
www.konkantoday.com