दापोली बसस्थानकात एसटी बसमध्ये शिरत असलेल्या प्रवाशाच्या खिशातून ५ हजार रुपये चोरणाऱ्या चोरट्याला अटक


दापोली बसस्थानकात एसटी बसमध्ये शिरत असलेल्या प्रवाशाच्या खिशातून ५ हजार रुपये चोरणाऱ्या अंकुश धोंडू झोरे संशयितास पकडण्यात दापोली पोलिसांना यश आले आहे.
दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, बुरोंडी भांडारवाडा येथील दिगंबर मधुकर बुरोंडकर व त्यांची पत्नी कल्पना शुक्रवारी (ता. २५) दुपारी १.३० वा. दापोली बसस्थानकातून सुटणाऱ्या दापोली- बुरोंडी शीतलनगर या बसमध्ये चढत असताना त्यांच्या पँटच्या डाव्या खिशात कोणीतरी हात घालत असल्याचे त्यांना समजल्यावर त्यांनी खिशाला हात लावला असता त्यांच्यामागे असलेल्या इसमाने त्यांच्या खिशातील ५ हजार रुपये काढून घेऊन पळकाढला.
बुरोंडकर यांनी चोर चोर असे ओरडण्यास सुरवात केल्यावर बसस्थानकात असलेल्या पोलिसांनी या चोराचा पाठलाग करून त्याला पकडले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button