चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबरपासून पुन्हा नियमित सुरु
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा येत्या १ सप्टेंबरपासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिले आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी प्रवासी विमान सेवेबाबत ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. चिपी विमानतळावरून विमान सेवा सुरळीत झाल्यास ऐन गणेशोत्सवात कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. मागील काही महिन्यांपासून चिपी विमानतळावरुन
मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेवेचा प्रश्न प्रलंबित होता. यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने व पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे. चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान प्रवास सेवा सुरु झाली होती. परंतु कालांतराने ही विमान सेवा अनियमित झाल्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवासांना रस्ते मार्ग, रेल्वेने कोकणात जावे लागत होते
Www.konkantoday.com