कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांनी वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्यांना चांगला प्रतिसाद दिला
कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांच्या गर्दीमुळे रेल्वेच्या इतर गाड्यांबरोबरच अत्याधुनिक वंदे भारत एक्स्प्रेसच्या फेऱ्यांना चाकरमान्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.मुंबईतून मोठ्या संख्येने गणेश भक्त गावी येणार असल्याने गणेशोत्सवात १५ सप्टेंबरसाठी तर वंदे भारत एक्सप्रेससाठीचे प्रतीक्षा यादीवरील बुकिंग २०० पेक्षा अधिक झाले आहे.
मडगाव ते मुंबई मार्गावर दोन महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसला कोकणसह गोव्यातील प्रवासी जनतेकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्टमधील प्रवासी भारमानाचे प्रमाण ९५ टक्के इतके आहे. प्रवासी प्रतिसादाचे हे प्रमाण एक वातानुकूलित रेल्वे गाडी चालवण्यासाठी रेल्वेचा उत्साह वाढवणारे आहे. १९ सप्टेंबरपासून कोकणात गणेशोत्सव सुरू होत आहे. यासाठी मुंबई, पुण्याहून मोठ्या प्रमाणावर चाकरमानी गावी येत असल्यामुळे. जवळपास सर्वच रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे
www.konkantoday.com