
एमआयडीसी एरियात असलेल्या गोडाऊन मधून मासेमारीचे साहित्याची चोरी
रत्नागिरी शहरानजीकच्या झाडगाव एमआयडीसी येथील गोडावून फोडून अज्ञाताने तब्बल 1 लाख 53 हजार 550 रुपयांचे मासेमारीचे सामान चोरले.ही घटना मंगळवार 8 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते मंगळवार 22 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.30 वा.कालावधीत घडली आहे.
याबाबत इम्तीखाफ नाझीम पठाण (36,रा.मिरकरवाडा खडप मोहल्ला,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानुसार,ते मासेमारीचा धंदा करत असून त्यांचे झाडगाव एमआयडीसी येथे गोडावून आहे.8 ऑगस्ट ते 22 ऑगस्टच्या कालावधीत अज्ञाताने त्यांच्या गोडावूनचे लोखंडी शटरला लावलेले कुलुप तसेच गोडावूनच्या मागे असलेल्या घराच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला.चोरटयाने 1 लाख 51 हजार 300 रुपये किंमतीच्या 178 मासेमारीच्या पितळी रिंगा त्याची गोलाई प्रत्येकी 5 इंच व प्रत्येकी 1 किलो 700 ग्रॅम,2 हजार 250 किंमतीच्या शिशाच्या 180 गुली (तुकडे) त्याचे वजन 15 किलो असा एकूण 1 लाख 53 हजार 550 रुपयांचा मद्द्रेमाल चोरुन नेला
www.konkantoday.com