उदय सामंत यांनी माझ्या नादी लागू नये आमदार भास्कर जाधव असे का म्हणाले
चिपळूण पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी माझ्यावर टीका करण्यापेक्षा आपल्या घराकडे
म्हणजेच ते ज्या जिल्ह्याचे पालकआहेत, त्या जिल्ह्याकडे पाहावे, माझ्या नादी लागू नये, असा इशारा उबाठा शिवसेना नेते, आमदार भास्करशेठ जाधव यांनी दिला आहे. मार्गताम्हाणे येथील एमआयडीसीला केवळ भाजपचा विरोध आहे, भाजपचा तो अजेंडा आहे. शिवाय माझी जर या ठिकाणी एक इंच जरी. जमीन असेल, तर मी
राजकारणातून निवृत्त होईन, असेही त्यांनी जाहीर केले. सामंत यांना नेहमी संभ्रमाचे वातावरण करण्याची सवय असल्याचेही त्यांनी सांगितले
पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी शिवसेनेच्या शहरात झालेल्या विद्यार्थी गुणगौरव सोहोळ्यात आ. जाधव यांच्यावर टीका केली होती. त्यावर पत्रकार परिषद घेत आ. जाधव यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले
www.konkantoday.com
पहा व्हिडिओ …