संगमेश्वर मधील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी साधला संवाद
रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी आज संगमेश्वर संपर्क कार्यालयात भेट देत येथील कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भेटी गाठी घेतल्या.यावेळी पक्ष बांधणी आणि विकास कामांचा आढावा घेण्यात आला.
मतदार संघातील गावा गावात दिलेली विकास कामाचा आढावा यावेळी पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी घेतला.संगमेश्वर संपर्क कार्यालयात अनेक लोक आपल्या समस्या घेवून आले होते त्याच्या प्रत्येकाच्या अडचणी पालकमंत्री यांनी जाणून त्यांना न्याय देण्याचे काम केले.यावेळेस पक्ष बांधणी बाबत पालकमंत्री आढावा घेतला विशेष कार्यकारी अधिकारी यादी आणि शिवदूत यांची यादी बाबत माहिती घेतली.कार्यकर्त्यांनी जोमात काम करण्याचे आदेश पालकमंत्री ना.उदयजी सामंत यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना दिले आहेत.
यावेळी उपजिल्हा प्रमुख राजेंश मुकादम,तालुक प्रमुख प्रमोद पवार,उप तालुका प्रमुख जमूरत अलजी,विभाग प्रमुख महेश देसाई,अतिश पाटणे,संदीप राहाटे,विवेक शेरे,संजय कदम,बाबू खातू,आदी सह परिसरातील सरपंच,ग्रामपंचायत सदस्य,पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
www konkantoday.com