या बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा!असे एसटीचा चालक म्हणतोय


देवरुख एसटी आगाराच्या देवरुख-पुणे आणि देवरुख-अर्नाळा या बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा,’ असे खळबळजनक आवाहन या आगारातील चालक अमित आपटे यांनी एका व्हिडीओद्वारे केले आहे. गेल्या २५ दिवसांत त्याबाबत आम्ही चालकांनी अनेकदा तक्रार नोंदवली आहे. पण त्यांची दखल न घेता आमच्यावरच कारवाई केली जाते.
आपण हा व्हिडीओ व्हायरल केल्यामुळे कारवाई होऊन घरी बसवले जाईल, याची जाणीव आहे. पण अपघात होऊन घरी बसण्यापेक्षा असे घरी बसलेले बरे, अशी टिप्पणी आपटे यांनी केली आहे.
आपटे यांच्या तक्रारीनंतर एसटीने महामंडळाने एक समितीने सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर आपटे यांना निलंबित केले आहे
प्रवाशांनी या परिस्थितीची गंभीरपणे नोंद घेऊन या बसगाडय़ांनी प्रवास टाळावा, तसेच राज्यकर्त्यांनी या समस्येची गंभीरपणे दखल घ्यावी, असेही आवाहन आपटे यांनी केले होते केले आहे. समाजमाध्यमांवर हा व्हिडीओ प्रसारित झाल्यावर अनेक नागरिकांनीही एसटीच्या कारभाराचे छायाचित्रांसह वाभाडे काढले.
दरम्याने देवरुख एस टी डेपोचे चालक आपटे यांनी काल फेसबुक लाईव्ह येत सोशल मीडियाचा आधार घेत देवरुख बस डेपो मधील गाड्यांची दुरवस्था याबाबतची वस्तुस्थिती जनतेसमोर आणली. त्या एसटी ड्रायव्हर वर एसटी प्रशासनाने चौकशी कालावधी मध्ये निलंबनाची कारवाई केली आहे.याचा निषेध नोंदवण्यासाठी आणि देवरुख डेपोच्या भोंगळ कारभाराविरुद्ध आवाज उठवण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बस डेपो मध्ये जाऊन स्थानक प्रमुखांना जाब विचारला.कोणत्याही परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध भारतीय जनता पार्टी कर्मचाऱ्यांच्या सोबत असेल असे ठणकावून सांगितले. एस टी प्रवाशांच्या जीवाशी जर कोण खेळणार असेल तर ते सहन केले जाणार नाही असा इशाराही दिला.
www.konkantoday.com

पहा व्हिडिओ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button