चिपळूणात मोबाईल मुळे झाला खुन
मोबाईल वरून सेल्फी फोटो काढताना अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत तर मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या करण्याच्याही ही घटना झाली आहेत मात्र आता चिपळूण कोळकेवाडी येथे झालेल्या खुनाला मोबाईलच कारणीभूत ठरला आहे
चिपळूणकोळकेवाडी-तांबडवाडीमध्ये रवींद्र विनायक सुर्वे याचा खून झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. या प्रकरणी सख्ख्या भावानेच मोबाईल घेतल्याच्या रागातून दुसऱ्या भावाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे. या प्रकरणी सख्ख्या भावासह अन्य एकाला पोलिसांनी अटक केली. सख्ख्या भावास सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २४ तासातच या घटनेचा उलगडा करण्यात
पोलिसांना यश आले आहे.
संजय विनायक सुर्वे (३९, कोळकेवाडी बडवाडी) या सख्ख्या भावासह वसंत मा हिलम (४० कोळकेवाडी-हासरेवाडी) ना अटक करण्यात आली आहे.
बुधवारी रात्री रवींद्र सुर्वे यांनी घरात मटण असल्याचे सांगून शेजाऱ्यांकडून दोन भाकऱ्या आणल्या होत्या. त्यानंतर गुरूवारी सकाळी ते उपड्यास्थितीत मृत दिसून आले होते. त्यांच्या शेजारी मोबाईल व दारूची बाटली दिसून आली होती. यातूनच अज्ञाताने हा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. या खुनाचा तपास करत असतानाच पोलिसांनी रवींद्र यांचा सख्खा भाऊ संजय सुर्वे तसेच वसंत हिलम या दोघांनाचौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यातूनच बुधवारी रात्री रवींद्र सुर्वे व संजय सुर्वे या दोन भावांमध्ये मोबाईल घेतल्याच्या कारणावरून वाद होताच संजयने रवींद्र यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खून केल्याची कबुली दिली.
www.konkantoday.com