
कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून प्रा. मधू दंडवतेंचे नाव देण्याची मागणी
कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला प्रा. मधू दंडवतेंचे नाव द्यावे, अशी मागणी वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याजवळ केली आहे, अशी माहिती संघटनेचे सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी दिली.
वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना याबाबत निवेदन पाठवले आहे. त्यात
म्हटले आहे, की ”कोकण रेल्वेला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली; पण, कोकण रेल्वेने कोकणाला काय दिले? कोकण रेल्वेच्या उभारणीत राज्याने सर्वाधिक २२ टक्के गुंतवणूक केली आहे; मात्र, कोकणात सुसज्ज टर्मिनस नसल्याने राज्याच्या वाट्याला फक्त तुतारी एक्स्प्रेस, दिवा-सावंतवाडी पॅसेंजर व दिवा-रत्नागिरी पॅसेंजर या तीनच रेल्वे आल्या. ६ टक्के गुंतवणूक करणाऱ्या गोव्याला ११, केरळला २३, १५ टक्के गुंतवणूक करणाऱ्या कर्नाटकाला ६, तर कोणतीही गुंतवणूक न करणाऱ्या तामिळनाडूला ६ रेल्वे नेहमीसाठी मिळाल्या आहेत. त्यामुळे सर्वच गणपती स्पेशल रेल्वे गोवा, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू राज्यात न्याव्या लागत आहेत. दरवर्षी साधारण रेल्वे प्रशासन ४०० गणपती विशेष रेल्वे सोडूनही कोकणात टर्मिनस नसल्याने त्या सर्व दक्षिणेतील राज्यांमध्ये न्याव्या लागत आहेत. परिणामी याचा आरक्षण कोठाही विभागला जातो व त्यामुळे ४०० रेल्वेही कोकणवासीय चाकरमान्यांना कमी पडतात. केवळ नाव कोकण रेल्वे, फायदा मात्र दक्षिणेतील राज्यांना. कोकण रेल्वेचा महाराष्ट्राला फायदा काय? असा संतप्त प्रश्न कोकणातील भूमिपुत्र राज्य व केंद्राला विचारत आहेत.
www.konkantoday.com