
राज्यात पुढील पाच ते सहा दिवस पावसाच्या हलक्या सरी बरसणार
पावसाला अनुकूल कोणतीही प्रभावी स्थिती निर्माण झाली नसल्याने राज्यात पुढील पाच ते सहा दिवस पावसाच्या हलक्या सरी बरसणार आहेत. पश्चिमी वाऱ्याची तीव्रता येत्या ४८ तासांनंतर वाढण्याची शक्यता आहे.त्यामुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
कोकण-गोव्यात पुढील सातही दिवस बहुतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर विदर्भात तुरळक ठिकाणी शुक्रवारी (ता.२५) मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
शनिवार (ता. २६) ते बुधवार (ता. ३०) दरम्यान काही ठिकाणी पाऊस पडेल. पुणे आणि परिसरात पुढील सहा दिवस हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
www.konkantoday.com