गुहागर विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदे सेनेला आणि अजित पवार राष्ट्रवादीला पडले खिंडार.

गुहागर मतदार संघातील खेड तालुक्यातील धामणदेवी जिल्हा परिषद गटातील श्री अजित आंब्रे श्री प्रवीण नायनाक यांच्यासह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट गटातील असंख्य युवा कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते आमदार श्री भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये या सर्वांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री पप्पू आंब्रे, तालुकाप्रमुख श्री. अंकुश काते, महिला आघाडी संघटक अरुणाताई आंब्रे, संदीप कदम, विभागप्रमुख श्री. राजू घाग, युवा सेना जिल्हा अधिकारी श्री. अजिंक्य मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये पक्षाच्या काही रिक्त जागांवर नवीन पदाधिकारी निवड करून त्यांना आमदार श्री. जाधव यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button