
मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था , मनसेची यात्रा
मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था पहाता राज ठाकरे, अमित ठाकरे यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही यात्रा काढत आहोत.अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात ही यात्रा होत आहे. मुंबईतल्या प्रत्येक विभागातील लोक सुद्धा येतील अशी माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली
२७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता ही यात्रा सुरू होईल. कोलाडला राज ठाकरे भेटतील. रस्त्याचे काम सुरू झाले आहे. लोकांना त्रास होऊ नये. म्हणून आम्ही टप्याटप्याने सुरू करत आहोत. पळसपे फाट्यापासून अमित ठाकरे आणि सरचिटणीस असतील. संध्याकाळी सहा वाजता हे सगळे कोलाड इथे जमतील. संध्याकाळी ६ वाजता राज ठाकरे कोलाड इथे भेटतील.
२०२३ च्या डिसेंबर पर्यंत आम्ही एक लेन सुरू करू असे सरकार म्हणत आहे. पण आम्हाला जी माहिती मिळाली त्यानुसार ते खड्डे बुजवत आहे. १५ हजार कोटी रूपये आतापर्यंत खर्च झाले. आता खड्यांचे कॉट्रेक्ट सुरू आहे. म्हणजे कंत्राट वर कंत्राट दिले जात आहे.
www konkantoday.com