
कुवारबाव येथील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सात ते नऊ एप्रिल रोजी हार्ट फुलनेस ध्यान योग शिबिराचे आयोजन.
रत्नागिरी प्रतिनिधी : संस्कृती मंत्रालय भारत सरकार आणि श्री रामचंद्र मिशन हार्टफुलनेस यांच्या सहकार्याने कुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दिनांक ७ ते ९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता या वेळेत हाऊसफुलनेस ज्ञानयोग शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष श्री. मारुती अंबरे यांनी केले आहेकुवारबाव परिसर ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिनांक 31 मार्च रोजी संपन्न झालेल्या मासिक स्नेह मेळाव्याच्या प्रसंगी हार्टफुलनेस मिशनचे प्रशिक्षक डॉक्टर सुधीर आकोदकर यांनी योग आणि हृदयावरील ध्यान कसे करावे याचे प्रात्यक्षिका सहित मार्गदर्शन केले या हार्टफुलनेस ध्यानामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे संवर्धन होऊन निरोगी सुदृढ आणि संतुलित आनंदी व्यक्तिमत्व विकसित होते हा या शिबिराचा मोठा लाभ आहे, असे त्यांनी यावेळी सांगितलेया स्नेह मेळाव्यात मार्च महिन्यात वाढदिवस असलेल्या ज्येष्ठांचा शुभेच्छा पत्र आणि श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला .त्यानंतर संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. वसंत पटवर्धन आणि प्रसिद्धी प्रमुख श्री. प्रभाकर कासेकर यांनी रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयात आता नेत्रदान आणि देह दान सुविधा उपलब्ध झाली असल्याने ज्येष्ठांनी श्रेष्ठ दान करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.कुवारबाव संघाचे आधारस्तंभ माजी कार्यवाह नारायण महादेव नानिवडेकर आणि प्रभाकर एकनाथ भाटकर या दोन ज्येष्ठ सदस्यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाल्याने या मेळाव्यात त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रारंभी संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. श्यामसुंदर सावंत देसाई यांनी संघाच्या वाटचालीचा आढावा सादर केला. यावेळी उपाध्यक्ष श्री. राजेंद्र कदम, ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. सुधाकर देवस्थळी, डॉक्टर मनोहर चांडगे, खजिनदार श्री. मुकुंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. शेवटी कार्यवाह श्री. सुरेश शेलार यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने मेळाव्याची सांगता करण्यात आली.