कोकण रेल्वे प्रवासादरम्यान तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या केरळमधील वृद्धाला अटक
रेल्वे प्रवासादरम्यान केरळ मधील एका वृद्धाकडून तरुणीशी लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा केल्याचा खळबळ जनक प्रकार घडला आहे याच प्रवासात रत्नागिरीमधील दोन जागरूक महिलांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी या तरूणीची
सुटका केली. दरम्यान याप्रकरणी तरूणीने शहर पोलिसांत तक्रार दाखल केली असून फिलिप फ्रान्सिस मस्क रेनस वय 71 या संशयिताविरूद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
केरळ संपर्कक्रांती एक्सप्रेस गाडीमध्ये हा प्रकार घडला. या गाडीमध्ये रत्नागिरीमधील २ महिला देखील प्रवास करत होत्या. ज्या डब्यात या महिला बसल्या होत्या. त्याच डब्यात हातात कुबड्या घेतलेला एक व्यक्ती बसला होता. प्रवासादरम्यान एका तरुणीला पाहून त्याने लगट करण्यास सुरूवात केली. तसेच तिच्या एकटेपणाचा फायदा उठवत तिला काही खायला हवे का तसेच माझ्यासोबत अपंगाच्या डब्यात झोपायला चल असे सदरचा संशयित त्या तरुणीला सांगू लागला या वृद्धाचा वागणूक संशयास्पद होती हा प्रकार डब्यातील इतर दोन महिलांचा लक्षात आल्यावर त्यांनी फोनवरून रत्नागिरीतील काही संघटनाच्या सदस्याना याची माहिती दिली गाडी रत्नागिरी दाखल होताच या व्यक्तीला खाली उतरवण्यात आले व त्याला चांगल्या पद्धतीने अद्दल घडवण्यात आली दरम्याने सदर व्यक्ती विरुद्ध तरुणीने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यावर पोलिसांनी या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे
www.konkantoday.com