
कोकण रेल्वे चोरट्यांचा सुळसुळाटमहिला रेल्वे प्रवाशाचा अडीच लाखाचा ऐवज लंपास
मेंगलोर ते मुंबई असा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅगमधील रोख आणि सोन्याचे दागिने असा २ लाख ६२ हजार २२ रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची तालुक्यातील निवसर रेल्वे स्टेशन घडली आहे. याप्रकरणी चोरट्या विरोधात लांजा पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. याबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या
माहितीनुसार गुडविन जाँसी डिसोजा मूळ राहणार मेंगलोर, सध्या नोकरी निमित्त मुंबई) हे शनिवारी १९ ऑगस्ट रोजी मेंगलोर ते मुंबई असा रेल्वेने प्रवास करत होते.
रविवारी २० ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास लांजा तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या निवसर रेल्वे स्टेशन यादरम्यान गुडविन डिसोजा हे आपली बॅग सीटवर ठेवून बाथरूमला गेले होते. यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम आणि सोन्याची दागिने असा एकूण २ लाख
६२ हजार २२ रुपयांचा ऐवज चोरून नेला.
www.konkantoday.com