
कर्जदारांकडून होणारी वसुली आपल्या खात्यात जमा करून कंपनीत अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा
रत्नागिरी: कर्जदारांकडून होणारी वसुली आपल्या खात्यात जमा करून कंपनीत अपहार करणाऱ्या कर्मचाऱ्यावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यश संदीप कदम असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याने कंपनीची १ लाख ८६ हजार रूपयांचा अपहार केल्याची तक्रार शहर पोलिसांत दाखल करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यश कदम हा मणीपाल बिझनेस सोल्युशन प्रा. लि कंपनीमधील कर्मचारी आहे. यश याला कंपनीने दुचाकी कर्जधारकांची कागदपत्रे गोळा करण्याचे काम सोपविले होते. यावेळी यश याने ३ ऑक्टोबर २०२२ ते १४ डिसेंबर २०२२ या. कालावधीत कर्जदारांकडील होणारी वसुलीची रक्कम स्वत:च्या खात्यावर जमा करून घेतली. कंपनीची फसवणूक करून अपहार केला अशी तक्रार कंपनीचे नवनीत एडवीन वॉल्टर यांनी शहर पोलिसांत दाखल केली.
www.konkantoday.com