नामदार उदय सामंत यांच्या संकल्पनेतून मंगळागौर कार्यक्रमानिमित्ताने हजारो महिला आल्या एका छताखाली
उदय सामंत फाउंडेशन, शिवसेना रत्नागिरी महिला शहर आघाडीचा अनोखा उपक्रम
पारंपारिक सण उत्सवाची परंपरा जपली जावी, नव्या पीढीला त्याचे आदान प्रदान व्हावे, खेळ व गाण्यांच्या माध्यमातून मंगळागौरीच्या परंपरेचे संवर्धन व्हावे, महिलांच्या कलागुणांना वाव मिळावे तसेच सर्वात महत्वाचे म्हणजे या सणानिमित्त सर्व स्तरातील महिलांनी एका छताखाली येवून हा उत्सवाचा आनंद घ्यावा या उद्देशाने उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून उदय सामंत फाउंडेशन, शिवसेना शहर महिला आघाडीच्या वतीने मंगळागौरची भव्य स्पर्धा रविवार दि. 20 ऑगस्ट 2023 रोजी हॉटेल विवेकच्या मागे देसाई बँक्वेट मध्ये पार पडली.
यावेळी मंगळागौर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा कृषी अधिकारी सुनंदा कु-हाडे, पत्रकार शोभना कांबळे, अनघा निकम, जान्हवी पाटील, मेहरुन नाकाडे, ज्योती मुळये, ज्येष्ठ नगरसेविका, शिवसेना रत्नागिरी शहर महिला आघाडी प्रमुख स्मितल पावसकर, शिवसेना महिला जिल्हा प्रमुख शिल्पा सुर्वे, शिवसेना रत्नागिरी महिला तालुका प्रमुख कांचन नागवेकर, माजी नगरसेविका दिशा साळवी, माजी नगरसेविका कौशल्या शेट्ये, माजी नगरसेविका श्रध्दा हळदणकर, माजी नगरसेविका अस्मिता चवंडे, माजी नगरसेविका वैभवी खेडेकर,पूजा पवार, सुप्रिया साळवी, शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर, माजी नगरसेवक निमेश नायर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री आज्ञेश्वर महालक्ष्मी महिला मंडळ यांनी गणेशवंदना सादर केले. यावेळी नामदार उदय सामंत यांच्यावर त्यांनी गाण सादर करुन त्यांच्या कर्तृत्वाचे महत्व विशद करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अतिशय नियोजनबध्द पार पडलेल्या या कार्यक्रमाचे उपस्थित सर्व महिलांनी आवर्जुन कौतुक केले. आलेल्या महिलांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीच्या सर्व माजी नगरसेविका पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्मितल पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूरेपूर खबरदारी घेतली होती.
या स्पर्धेत 7 ते 20 वयोगटातील 5 संघ, 21 ते 50 वयोगटातील 20 संघ , 50 वयोगटापुढील 2 संघ असे एकूण 27 महिलांचे संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेचे परिक्षण मिताली भिडे व श्वेता जोगळेकर यांनी केले.
माहेर संस्थेच्या मुली व महिला यांनी देखील या मंगळागौर कार्यक्रमात आपल्या कलेचे विशेष सादरीकरण केले. हा संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्मितल पावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना रत्नागिरी शहर महिला आघाडीच्या सर्व पदाधिका-यांनी खूप मेहनत घेतली.दिशा साळवी,पूजा पवार यांनी देखील विशेष मेहनत घेतली.
सहभागी स्पर्धक व उपस्थित महिला वर्गातून देखील या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले जात होते. नामदार उदय सामंत यांनी महिलांसाठी हे मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे आभार व्यक्त केले गेले. भविष्यात महिलांच्या अशा उपक्रमांना 3 ते 4 दिवसांचे कार्यक्रमाची रूपरेषा असणारे मोठे व्यासपीठ उपलब्ध व्हावे अशी मागणी देखील केली गेली. रत्नागिरीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येने महिलांना एकत्र आणून मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करणारा हा आत्तापर्यंतचा एकमेव कार्यक्रम ठरला आहे. आणि ज्याचे नियोजन तसेच कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी कामे देखील कार्यक्रम संपेपर्यंत महिलांनीच पार पाडली.
(उदय सामंत फाउंडेशनने क्रीडा, सांस्कृतिक, ग्रंथ, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील युवक वर्गाला समोर ठेवून अल्पावधीतच कोकणात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. आतापर्यंत चरित्रकार धनंजय कीर यांच्या अनुवादित केलेल्या चरित्राचा प्रकाशन सोहळा, राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धा, राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा आणि आता रत्नागिरी जिल्ह्यातील अशी एक भव्य मंगळागौर स्पर्धा यशस्वीपणे राबविली आहे. उदय सामंत फाउंडेशन तरुणांना एक मार्गदर्शक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याचे काम करत आहे.
www.konkantoday.com