
तुम्ही नवीन LPG गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर अधिक पैसे मोजायला तयार रहा
तुम्ही नवीन LPG गॅस कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देईल. होय, पेट्रोलियम कंपन्यांनी नवीन घरगुती गॅस कनेक्शनच्या किमती वाढवल्या आहेत.यापूर्वी सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी 1450 रुपये मोजावे लागत होते. पण आता यासाठी तुम्हाला 750 रुपये अधिक म्हणजेच 2200 रुपये द्यावे लागतील.
पेट्रोलियम कंपन्यांच्या वतीने 14.2 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या कनेक्शनमध्ये प्रति सिलेंडर 750 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जर तुम्ही दोन सिलिंडर कनेक्शन घेतले तर तुम्हाला 1500 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. म्हणजेच, यासाठी तुम्हाला 4400 रुपये सिक्युरिटी म्हणून भरावे लागतील. यापूर्वी यासाठी 2900 रुपये मोजावे लागत होते. कंपन्यांनी केलेला हा बदल 16 जूनपासून लागू होणार आहे.
www.konkantoday.com