रत्नागिरी शहरानजिकच्यामिरजोळे खालचापाट येथे भूस्खलन सुरूच
रत्नागिरी शहरानजिकच्या मिरजोळे येथील मधलीवाडी-वाडकरवाडी दरम्यानच्या खालचापाट परिसरातील शेतजमिनीत दरवर्षी अतिवृष्टीमुळे होणारे भूस्खलन अजूनही सुरूच असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांची शेतकर्यांना प्रतिक्षा राहिली आहे.
त्यासंदर्भात नुकतीच प्रशासनाच्यावतीने तहसिलदार व भूजल सर्वेक्षण विभागाच्या अधिकार्यांनी पाहणी केली. सातत्याने होत असलेल्या खालचापाट परिसरातील शेतकरी हताश झालेले आहेत. या होत असलेल्या भूस्खलनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी यापूर्वीच पाटबंधारे विभागाने १ कोटी ३५ लाखांचा प्रस्ताव तयार केला होता. पण येथील खचणार्या अर्ध्या भागात संरक्षक भिंत उभारण्यात आली. उर्वरित खचणार्या शेतीचे नुकसान टाळण्यासाठी नदीपात्राकडेच मोठ्या भागात संरक्षक उपाययोजनांची येथील शेतकर्यांना अजूनही प्रतिक्षा लागून राहिली आहे. अतिवृष्टीच्या काळात या ठिकाणी होणार्या या सततच्या भूस्खलनामुळे शेती संकटात आली आहे.
त्या ठिकाणचे होणारे नुकसान पाहता जिल्हा प्रशासनस्तरावरून पुन्हा कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. सोमवारी रत्नागिरीचे तहसिलदार राजाराम म्हात्रे व भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी संदीप माने यांनी भूस्खलनामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावेळी तलाठी संदेश घाग ग्रामस्थ भाऊ भाटवडेकर, पोलीस पाटील सौ. जोशी, तसेच शेतकरी यांची उपस्थिती होती. याबाबतचा अहवाल जिल्हाधिकार्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. www.konkantoday.com