कोकण रेल्वे मार्गावरून मुंबई ते मडगाव अशी धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार
कोकण रेल्वे मार्गावरून मुंबई ते मडगाव अशी धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. ही एक्सप्रेस कोकण रेल्वे मार्गावरून धावणार असून या संदर्भात येणाऱ्या उलटसुलट बातम्यांना कोकण रेल्वेच्यावतीने पूर्णविराम देण्यात आला आहे.
दि. ३ जून रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचा शुभारंभ करण्यात येणार होता. मडगाव येथील कार्यक्रमाला गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत उपस्थित at राहाणार होते. ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या उद्घाटन सोहोळ्याची पूर्वतयारी पूर्ण झाली होती. ओडिशा राज्यातील रेल्वे अपघातामुळे ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसच्या शुभारंभाचा सोहोळा तात्पुरत्या स्वरूपात लांबणीवर टाकण्यात आला आहे. ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस कोकण रेल्वे मार्गावरून धावणार आहे. मुंबई ते मडगाव या मार्गावर धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचे वेळापत्रकं आठवडाभरात ‘जाहीर करण्यात येणार आहे. जिल्ह्यात रत्नागिरी, खेड असे थांबे ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला देण्यात आले आहेत. चिपळूण थांब्याबाबतचा निर्णय प्रलंबित असून याबाबत रेल्वेमंत्री अंतिम निर्णय देणार असल्याचे सांगण्यात आले. ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस रद्द झालेली नसून ती लवकरच कोकण रेल्वे मार्गावर धावेल, असे मुख्य कार्यालयामार्फत सांगण्यात आले आहे.
www.konkantoday.com