जी एम शेटये हायस्कूल बसणी शाळेच्या दहावीच्या निकालाने राखली १००% निकालाची परंपरा
रत्नागिरी- जी एम शेट्ये हायस्कूल बसणीचा निकाल चालूवर्षी देखील १००% लागला आहे. या वर्षी प्रथम येणाऱ्या कु. मंथन वायंगणकर याने ९३.४० गुण मिळवत नवा इतिहास रचला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व शाळा चांगल्या गुणवत्तेमध्ये कमी नाहीत हे या निकालाने सिद्ध झाले. कुमारी तनया ठीक हिने ९२% गुण मिळवून शाळेत दुसरी आली तर आकांक्षा शिवलकर हिने ९०% गुण मिळवून तिसरी आली आहे.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे गणित विभागाचे प्रमुख डॉ करवंजे व शास्त्रशाखेचे डॉ उमेश संकपाळ यांचे विध्यार्थाना मार्गदर्शन लाभले.
जी एम शेट्ये हायस्कूल बसानीचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापिका सौ. सुषमा शिरधनकर,सौ.पंडित,श्री. नाईक व सायली मयेकर यांनी घेतलेल्या विशेष मेहनतीमुळेच हे यश प्राप्त झाले अशा शब्दात संस्थेचे चेरमन भाऊ शेट्ये यांनी अभिनंदन केले. या यशाबद्दल संस्थेचे सेक्रेटरी विलास भोसले, उपाध्यक्ष मोहन धन्गाडे सर्व पदाधिकारी माजी विध्यार्थी पंचक्रोशीतील ग्रामस्थ पालक यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले
www.konkantoday.com