जुने दागिने नवीन डिझाईनसाठी घेतल्यानंतर सोनाराने ते परत न देता  दागिन्याचा अपहार केला, चिपळूण येथील घटना

0
58

चिपळूण शहरात जुने दागिने नवीन डिझाईनसाठी घेतल्यानंतर सोनाराने ते परत न देता यातूनच त्या दागिन्याचा अपहार केल्याची घटना ऑक्टोबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत शहरातील खेराडे कॉम्प्लेक्स येथील प्रणव गोल्ड येथे घडली. या प्रकरणी दागिन्यांचा अपहार करणाऱ्यांवर येथील पोलीस स्थानकात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णेंद्र उर्फप्रणव मोंडल असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
शहरातील प्रणव गोल्ड येथे घडला प्रकार,  १४ ऑक्टोबर २०२२ ते ९ जानेवारी २०२३ या कालावधीत मोंडल याने एका नागरिकाचे जुने दागिने नवीन बनवून देतो, असे सांगून त्या नागरिकाचा विश्वास संपादन कैला. त्यानुसार त्या नागरिकाने दीड लाख किंमतीचे जुने वापराचे सोन्याचे दागिने नवीन डिझाईनचे बनवण्यासाठी दिले. मात्र प्रणव मोंडल याने त्या दागिन्याचे नवीन डिझाईनचे दागिने बनवले नाहीत. याबद्दल त्या नागरिकाने वारंवार नवीन डिझाईनच्या दागिन्याची मागणी केली. तसेच नवीन डिझाईनचे दागिने तयार नसतील तर जुने दागिने परत द्या, असे वारंवार सांगितले. मात्र मोंडल याने हे दागिने, परत न करता त्या दागिन्याचा अपहार केला. या प्रकरणी मोंडल याच्यावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here